पिंपळे जगताप ( ता.शिरूर) येथे पारंपारिक नऊवारी साडी, नथनी, केसात माळलेला गजरा, हिरवा चुडा आणि पारंपरिक खेळ आणि गाणी गात वेशात साडे पाचशे महिलांच्या उपस्थितीत मंगळा गौर कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामपंचायत पिंपळे जगताप आयोजित श्री.सूर्यकांत र.शिवले यांचे व्याख्यान. महिलांना बचत गटाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.बचत गटाचे महत्व, बचत गटा मार्फत आपण व्यवसाय कसा सुरु करायचा व्यवसायाचे प्रशिक्षण कोणत्या माध्यमातून घ्यायचे, कोणकोणते व्यवसाय करू शकतात कर्ज घेणे, कर्जाची देवाणघेवाण याबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रम प्रसंगी अनेक प्रकारच्या फुगड्या, आगोटापागोटा, साळुंकी, गाठोडे, लाटा बाई लाटा, घोडा हाट, करवंटी झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ , विविध गण्यानावर डान्स , दिंडी, तुळस डोक्यावर घेत अनेक प्रकारांची गाणी व खेळ खेळले.यावेळी पारंपरिक महिलांची गाणी, भोंडला,उखाणे असा मनोरंजन व प्रबोधन कार्यक्रम करण्यात आला.

यावेळी सरपंच सोनल अशोक नाईकनवरे, उपसरपंच अनिता दौंडकर , माजी उपसरपंच व सदस्या रेश्मा नितीन कुसेकर , सदस्या शुभांगि शेळके, सदस्या दिपाली तांबे,सूनिता बेंडभर, जि. प शाळेच्या शिक्षिका अनुराधा गट,नयना आरगडे,मंगल वाजे, स्वाती बेंडभर पोलिस पाटील वर्षा थिटे व महिला भगिनी व बालगोपाल मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा गट मॅडम व आरगडे मॅडम यांनी केले
सहभागी प्रत्त्येक ग्रुपला सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांच्यावतीने आकर्षक ट्रॉफी देण्यात आली तसेच उपस्थित सर्व महिलांना तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले