नागरिकांनी काळजी घ्यावी, वनविभाग कर्मचारी कियोन कंपनीत दाखल बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू – सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे सकाळी एक दीड दोन वर्षांचा बिबट्या गव्हाणे वस्ती जवळ असलेल्या कियोन कंपनीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या अधिकारी स्मिता राजहंस यांनी नागरिकांनी घाबरून जावू नये व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी लवकरच बिबट्याला जेरबंद करण्यात येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोरेगाव भीमा येथील गव्हाणे वस्ती नजदीक असलेल्या कियोन कंपनीत दीड दोन वर्षांचा बिबट्या शिरल्याने सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून याची माहिती मिळताच वनविभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने रेस्क्यू टीम व स्थानिक आर एफ ओ निलकंठ गव्हाणे, आर ओ गौरी हिंगणे , प्राणीमित्र सर्पमित्र शेरखान शेख व वणपाल व इतर कर्मचारी तातडीने दाखल झाले असून बिबट्याचा सोध घेण्यात येत असून तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.