
श्री क्षेत्र जेजुरी येथे चंपाषष्ठी उत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरुवात
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र जेजुरी गडावरील श्री मार्तंड मल्हारी देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची वेदमंत्राच्या घोषात करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करून सोमवारी मोठ्या भक्तिभावाने सुरुवात करण्यात आली. मार्गशीर्ष महिन्यात दिवटी पेटवून कुलधर्म कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक येत असतात. सोमवारी (ता. २)सकाळी पाखळणी करण्यात आली. त्यानंतर बालव्दारीमध्ये खंडोबाच्या मूर्तींची स्थापना केली. पानाचे…